गोकुळ भाऊ झिरवाळ

Image
Close
Close

नवे उदयोन्मुख नेतृत्व
मा. गोकुळ भाऊ झिरवाळ.....

नमस्कार!
मी गोकुळ नरहरी झिरवाळ माझी खरी सुरवात नरहरी सीताराम झिरवाळ या नावाने होते. माझे आजोबा जरी राजकरणी नसेल तरी माझे वडील मा.ना.श्री नरहरी झिरवाळ साहेब हे सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, विधान सभा सदस्य आमदार, विधानसभा उपध्यक्ष, विधानसभा प्रभारी अध्यक्ष आता मंत्री असा प्रवास केला आहे. हे सर्वाना ज्ञात आहे. परंतु ह प्रवास करत असताना साहेबाना अनेक संघर्ष करावा लागला आहे. हा संघर्ष मी जवळून बघितला आहे. त्यांचा पडता काळ, सतेचाकाळ, रोज समजासाठी दिलेला वेळ त्यांतून खूप काही शिकायला मिळाले. मी आणि माझा मोठे भाऊ आम्ही दोघांनीपण खूप जवळून साहेबांचा संघर्ष बघितला आणि जाणून घेतला. समाजातील तळागाळातील जनतेचे समस्या, प्रश्न कसे सोडवावेत याची समज मला त्यांनी अनेक प्रसंगात करून दिली आहे. त्यामुळे राजकारना पेक्षा समाजकारणाला प्रथम प्राधाने दिले गेले पाहिजे ह्याची पण समज त्यातून मला मिळाली.

आणि मग माझी त्या नंतर सुरवात माझ कुटुंब तसे शेतकरी कुटुंब त्यात साहेब हे पूर्वी पासून राजकारणात म्हणून आमची पूर्ण शेती आई नेच बघायची आम्ही दोघे पण शालीय शिक्षण घेत होतो तो पर्यन्त शेती आई बघायची आणि नंतर आम्ही मोठे झालो त्यांतर आम्ही दोघ जन पण शेतीत लक्ष द्यायला लागलो. मग शेतीत नवीन चांगल्या प्रतीच्या बियाणे कोणते यावर आम्ही विचार करू लागलो. शेतीत तशी चांगली प्रगती होऊ लागली. पण माझ्या आकलना नुसार आमच्या पेक्षा पण आमच्या आईची पारंपारिक शेती आम्हाला भारीभरत होती त्याला कारण होती म्हणजे आई पारंपारिक शेती हि वर्षभरात घरात लागणाऱ्या घर उपयोगी असायची त्यात मिरची, सोप, आळू, वरकंद, लसून, कांदे हे असे अनेक घरउपयोगी सादनसामुगरी तयार ठेवायची त्यात चोक हिशोबी त्या मुळे तिचे शेतीचे नियोजन आज पण चांगले आहे आणि पूर्ण शेती मोठे भाऊ आणि आई बघते.

माझे कॉलेज चे जीवन तस साधेच गेले पण कोलेज जीवनात पण नेत्तृव करणेचे आवड मला होतीच त्या नंतर पदवीधर शिक्षण घेत असतानी चांगली समज पण येत होती आपण काय केल पाहिजे अधून मधून साहेब त्याचं काही काम असले का सोबत घेऊन जायला लागले. समाजकारण ची इच्छा तर मला होतीच मग मला थोडी जास्तच समाजकरनाची गोडी निर्माण झाली मग छोटे मोठे प्रश्न हाताळून बघू लागलो पहिल्यादा खूप अडचणी निर्माण झाल्या त्यात एक ठिकाणी विचार यायचा हे सर्व सोडून द्याव आपली शेती, शिक्षण च चांगल कराव पण मधेच हे सर्व सोडू पण देऊ शकत नव्हतो. म्हणून जे होईल ते होईल पण आता काम करत जायचं पहिल्यादा प्रशासनात ओळखी जास्त नसल्याणे अनेक जन ओळखत नव्हते हळू हळू थोडी ओळख व्हायला सुरवात झाली. हे सर्व करत असताना लोकप्रतिनिधीना कुठ कुठल्या समस्यांना थोड द्याव लागेते हे समजायला लागल. जनतेचे प्रश्न म्हणजे आपलाच प्रश्न म्हणून मार्गी लावला गेला पाहिजे अस्या मताचा मी आहे. त्यात काही प्रश्न मार्गी लागतात काही प्रश्ना वेळ पण लागतो. पण प्रश्न समजून घेतले तर सुटतात.

आता जे काही करायचे ते फक्त आणि फक्त या जनते साठी जे काही लढायचं जनतेच्या प्रश्नसाठी हि खून गाठ बांधून किती पण आडी अडचणी आल्या तरी किती पण संघर्ष करावा लागला तरी चालेल पण आता थांबायचं नाही जनते साठी रात्री चा दिवस करून अडचणी वर मात करायची आपली वाट आपणच तयार करायची ती किती पण खडतर असेल तरी चालेल मार्ग निघेल. त्यात एक असा पण एक विचार येतो का वडील जेव्हा माझ्या एवढे असतील तेव्हातर सर्व नवीन असेल त्यांनी त्यातून मार्ग काढलेला आता तर त्यांनी तो रस्ता पण दाखविलाय फक्त जरा जोमाने काम करावे लागेल. पुढे जाऊन अनेक जन म्हणतात कि तुला अडचण कधीच नाही येणार कारण तुला एक समाजकारणाचा, राजकारणाचा वारसा आहे. पण नुसता वारसा सांगून पूर्ण नाही होणार वारसाणे थोडे प्रश्न मार्गी लागतील पण बाकीचे आपल्या पाठपुरावा कसा करतो त्यावरच अवलंबून असेल त्यात काही शंका नाही. राजकरणाच्या पटलावर हारजीत चालू असते जय पराजय सुरु असत पण हेतू बरोबर असेल तर विजय फळ नक्की मिळेल. आपण सर्व जनतेनी आम्हा सर्वावर खूप प्रेम दिलय थोर मोठांचे आशीर्वाद दिलेत म्हणून हि संधी बघावयास मिळाली ह्या सर्व काही हे तमाम जनतेचे कृपा आशीर्वाद आहेत आणि भविष्यात राहतील अशी अशा बाळगतो. साहेब नेहमी आम्ही चर्चा करतो तेव्हा सांगतात गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये

Back to Home Page